निशिकांत दुबे यांनी दिली उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराची यादी; पण “नॅचरल करप्ट पार्टीच्या” सोबतीची कुणी घ्यायची जबाबदारी??
निशिकांत दुबे यांनी दिली उद्धव ठाकरेंच्या भ्रष्टाचाराची यादी, पण त्यामुळेच “नॅचरल करप्ट पार्टीच्या” सोबतीची कुणी यायची जबाबदारी??, असा सवाल तयार झाला.भाजपचे बडबोले खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी लोकांविरुद्ध बोलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणले. ठाकरे बंधूंना ठोकता ठोकता निशिकांत दुबे मराठी लोकांवर घसरले. बाहेरच्यांच्या टॅक्स वर मराठी लोक जगतात, असे बोलून बसले. शेवटी देवेंद्र फडणवीस यांना त्या संदर्भात खुलासा करावा लागला. निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यापासून महाराष्ट्र भाजपला अंतर राखावे लागले. पण जे काही झाले ते “पॉलिटिकली कॅल्क्युलेटेड” झाले असेच बोलले गेले. कारण त्यातून मराठी – अमराठी मतांचे ध्रुवीकरण समोर आले.