Nirmala Sitharaman : स्टॅलिन सरकारने ‘₹’ चे चिन्ह बदलल्याने निर्मला सीतारमण संतापल्या, म्हणाल्या…
२०२५-२६ च्या अर्थसंकल्पासाठी तामिळनाडू सरकारने तयार केलेल्या प्रचारात्मक साहित्यात रुपयाचे चिन्ह तमिळ अक्षराने बदलण्यात आले. या मुद्द्यावरून आता राजकारण तापले आहे. भाजप याला राष्ट्रीय चिन्हाचा अनादर म्हणत आहे, तर द्रमुक सरकार हा बदल तमिळ भाषेचा आदर म्हणून सादर करत आहे.