Nilesh Ghaywal’ : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द होणार, बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवल्याचे उघड
पुणे शहरातील कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट पुणे पोलिस लवकरच रद्द करणार आहेत. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. घायवळने बनावट कागदपत्रे आणि खोटी माहिती सादर करून हा पासपोर्ट मिळवल्याचे तपासात उघड झाले आहे.