• Download App
    Nida Khan judicial custody | The Focus India

    Nida Khan judicial custody

    Nida Khan Case : निदा खान इम्तियाज जलील यांची नातेवाईक; संजय शिरसाटांचा थेट आरोप, मुख्यमंत्र्यांना पत्र; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

    नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवरील अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराच्या आरोपांमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणाला राजकीय रंग चढताना दिसत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार माजी खासदार इम्तियाज जलील असल्याचा थेट दावा त्यांनी केला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

    Read more