Delcy Rodriguez : अमेरिकेच्या अटी मान्य केल्यानेच वाचले व्हेनेझुएलाच्या मंत्र्यांचे प्राण; कार्यकारी अध्यक्षा म्हणाल्या- 15 मिनिटांत निर्णय घ्यायचा होता
व्हेनेझुएलाच्या कार्यकारी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांचा एक व्हिडिओ लीक झाला आहे. द गार्डियनच्या वृत्तानुसार, यात रॉड्रिगेज दावा करत आहेत की, अमेरिकेने तत्कालीन अध्यक्ष निकोलस मादुरो यांना पकडले, तेव्हा त्यांना आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना फक्त 15 मिनिटांचा वेळ दिला होता. त्यांना सांगण्यात आले होते की, जर त्यांनी अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर सर्वांना गोळ्या घालण्यात येतील.