NIA uncovers : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मूळ मास्टरमाइंड NIAने काढला शोधून
पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तळाशी पोहोचत असताना, तपास यंत्रणांना एक मोठा सुगावा लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्याच्या कटामागे अल उमर मुजाहिदीन नावाच्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मुश्ताक अहमद जरगरचे नाव स्पष्टपणे समोर आले आहे. जरगर हा तोच दहशतवादी आहे जो १९९९ च्या कंदहार विमान अपहरण प्रकरणात सुटला होता. सध्या तो पाकिस्तानात राहतो.