Anmol Bishnoi : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी अनमोल बिष्णोईला अटक, भारतात येताच एनआयएची कारवाई
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिष्णोईला भारतात दाखल होताच एनआयएने अटक केली. अमेरिकेतून हद्दपार केल्यानंतर तो बुधवारी दिल्लीत दाखल झाला होता. विशेष न्यायालयाने त्याला ११ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली.