NHAI GM : NHAIच्या GMला १५ लाखांची लाच घेताना अटक, सीबीआयने रंगेहाथ पकडले
सीबीआयने एनएचएआयच्या जीएमला लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. जेव्हा सीबीआयने त्याला पकडले तेव्हा तो १५ लाख रुपयांची लाच घेत होता. सीबीआयने जीएमसह आणखी ३ जणांना अटक केली आहे. जीएमचे नाव रामप्रीत पासवान असल्याचे सांगितले जात आहे, तो सध्या पाटणा प्रादेशिक कार्यालयात रूजू आहे. त्याच वेळी, NHI ने त्याच्या घरावरही छापा टाकला, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.