ट्रम्पवर टीका करणाऱ्या राजदूताला न्यूझीलंडने काढले; युक्रेनसोबत युद्ध संपवण्याच्या पद्धतीवर नाराज होते
न्यूझीलंडने ब्रिटनमधील उच्चायुक्त फिल गॉफ यांना बडतर्फ केले आहे. लंडनमधील एका कार्यक्रमात बोलताना गॉफ म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याचा ट्रम्प यांचा दृष्टिकोन १९३८ च्या म्युनिक करारासारखाच होता. म्युनिक करारामुळे हिटलरला चेकोस्लोव्हाकिया ताब्यात घेण्याची परवानगी मिळाली. आता ट्रम्प पुन्हा तीच चूक करणार आहेत. त्यांना इतिहासाची समज नाही.