Online Gaming : 1 ऑक्टोबरपासून नवीन ऑनलाइन गेमिंग कायदा लागू; IT मंत्री म्हणाले- आम्ही प्रथम गेमिंग उद्योगाशी चर्चा करू
आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले की, ऑनलाइन गेमिंग कायदा २०२५ हा १ ऑक्टोबरपासून लागू होईल. कायदा लागू करण्यापूर्वी सरकारने गेमिंग कंपन्या, बँका आणि इतर भागधारकांशी अनेक चर्चा केल्या. केंद्रीय मंत्री म्हणाले, सरकार संवाद आणि सल्लामसलत करण्यास पूर्णपणे तयार आहे. नियम लागू करण्यापूर्वी गेमिंग उद्योगासोबत आणखी एक बैठक घेतली जाईल. आवश्यक असल्यास, अंमलबजावणीसाठी अधिक वेळ दिला जाऊ शकतो.