Netanyahu : नेतन्याहू म्हणाले- 1 लाख लोकांनी गाझा शहर सोडले, आकाशातून पत्रके टाकण्यात आली
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले आहे की, १ लाख लोक गाझा शहर सोडून गेले आहेत. जेरुसलेममध्ये झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, नेतन्याहू म्हणाले की, हमास लोकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून त्यांचा मानवी ढाल म्हणून वापर करता येईल. इस्रायली पंतप्रधानांच्या मते, हमासने महिला आणि मुलांना गोळ्या घालून रोखण्याचा प्रयत्न केला आहे.