Nepal : नेपाळमध्ये ओली-प्रचंड आणि देउबा यांच्या पक्षांमध्ये युती शक्य; जागावाटप आणि रणनीतीवर चर्चा सुरू
नेपाळमध्ये तीन माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा, के.पी. शर्मा ओली आणि पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या पक्षांकडून युतीची तयारी सुरू आहे. ही युती संसदेच्या वरच्या सभागृहातील ‘राष्ट्रीय सभा’ निवडणुकीसाठी असू शकते. या युतीमध्ये मधेस क्षेत्रातील पक्षालाही समाविष्ट करण्याचा विचार सुरू आहे.