Nepal Rebellio : नेपाळ बंडखोरीवर CJI म्हणाले- आम्हाला आपल्या संविधानाचा अभिमान, शेजारील देशांत काय चालले ते पाहा
राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या मंजुरीची डेडलाइन मागणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सरन्यायाधीश बीआर गवई यांनी बुधवारी नेपाळ बंडाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “आपल्या संविधानाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, शेजारील देशांमध्ये काय चालले आहे ते पहा. आपण ते नेपाळमध्ये पाहत आहोत.”