NEET-UG Paper Leak Case : नीट-यूजी पेपरफुटी प्रकरण:माेटेगावकर, कुलकर्णीसह 13 जणांवर सीबीआयचे 422 पानी आरोपपत्र
वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट-यूजी २०२६ परीक्षेतील प्रश्नफुटीप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने १३ आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. लातूरमधील आरसीसी कोचिंग इन्स्टिट्यूटचा संचालक शिवराज मोटेगावकर तसेच पुण्यातील एपीएमए कोचिंग इन्स्टिट्यूटचा भौतिकशास्त्र शिक्षक तेजस शाहवर फुटलेले प्रश्न विद्यार्थ्यांसाठी वापरल्याचा ठपका आहे. त्यांच्यावर गुन्हेगारी कट, फसवणूक, पुरावे नष्ट करणे यांसह भारतीय न्याय संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा (अनुचित साधनांना प्रतिबंध) कायदा, २०२४ अंतर्गत आरोप ठेवले आहेत.