NEET Row : CJP चे आज जंतर-मंतरवर आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि आत्महत्या केलेल्या NEET विद्यार्थ्यांसाठी ₹1-1 कोटींची मागणी
NEET पेपर लीक आणि परीक्षा प्रणालीतील गोंधळावरून कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके आज दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करतील. यापूर्वी अभिजीत यांनी 6 जून रोजी जंतर-मंतरवर निदर्शने केली होती. CJP ने आतापर्यंत पुणे, लखनऊ, अमृतसर, हैदराबाद, बेंगळूरु, जयपूर आणि नागपूर येथेही आंदोलने केली आहेत.