Women’s Dept : समान नागरी कायद्यासाठी राज्य सरकारने तीन विभागांकडून अभिप्राय मागवले; महिनाभरात सरकार भूमिका जाहीर करणार, नीलम गोऱ्हेंचे स्पष्टीकरण
समान नागरी कायद्या’बाबत राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. या कायद्यासंदर्भात विधी व न्याय, सामान्य प्रशासन तसेच महिला व बालकल्याण विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आले आहेत. येत्या महिनाभरात सर्व संबंधित विभागांची बैठक घेऊन सरकार अधिकृत भूमिका मांडेल, असे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी विधान परिषदेत स्पष्ट केले.