Ne Zha-2 : चिनी अॅनिमेटेड चित्रपट ‘ने झा-2’ ने रचला इतिहास; अवघ्या 23 दिवसांत 14 हजार कोटींची कमाई, सर्वाधिक कलेक्शनचा ॲनिमेटेड चित्रपट
चीनमधील ॲनिमेटेड ब्लॉकबस्टर चित्रपट ‘ने झा-2’ ने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये इतिहास रचला आहे. हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. या चित्रपटाने सर्व डिस्ने चित्रपटांना मागे टाकले आहे. बुधवारी नवीन आकडेवारी समोर आली, त्यानुसार चित्रपटाने केवळ 22 दिवसांत जगभरात 14,728 कोटींची कमाई केली आहे.