Nitish Kumar : नितीशकुमार एनडीएच्या नेतेपदी, आज दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
जनता दल (युनायटेड) चे सर्वेसर्वा नितीशकुमार गुरुवारी पाटणा येथील गांधी मैदानात बिहारचे मुख्यमंत्री म्हणून गुरुवारी सकाळी ११.३० वाजता शपथ घेणार आहेत. ते १० व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन एक नवा विक्रम प्रस्थापित करतील. पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.