कोलकात्यातील विधी विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाची सुओ मोटो दखल, पोलीस आयुक्तांना तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश
कोलकात्यातील एका नामांकित विधी महाविद्यालयात अमानुष घटना उघडकीस आली असून एका २४ वर्षीय विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्या आवारातच सामूहिक बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.