Laxman Hake : लक्ष्मण हाके समाजात तेढ निर्माण करण्यासाठी वादग्रस्त विधाने करतात; महाराष्ट्रात फिरूही देणार नाही; राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा इशारा
दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी लक्ष्मण हाके हे जाणीवपूर्वक वादग्रस्त विधान करत असून, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस त्यांची चड्डी पिवळी केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिला आहे. तसेच लक्ष्मण हाके यांची हालत भटक्या कुत्र्यासारखी करू, असेही त्यांनी म्हटले आहे. लक्ष्मण हाकेंना महाराष्ट्रात फिरू दिले जाणार नाही, असा इशाराही चव्हाण यांनी दिला. लक्ष्मण हाके यांच्यावर प्रतिक्रिया देताना सुरज चव्हाण यांची जीभ घसरल्याचे चित्र दिसून आले.