Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना ‘युती’चा प्रस्ताव; अजित पवार गटाच्या नेत्याचा दावा; ‘स्थानिक’च्या निवडणुकांत दोन्ही पवार एकत्र दिसणार?
\राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकत्र येण्याच्या तयारीत असल्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्थानिक निवडणुकांमध्ये एकत्र येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये संवाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.