Jayant Patil : अजित पवार NCP एकीकरणासाठी सकारात्मक होते; जयंत पाटलांचा दावा- अनेक गुप्त बैठका झाल्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या एकीकरणाबाबत पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली असून, शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र यावेत, हीच आपली सुरुवातीपासूनची भूमिका होती, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच एकीकरणाच्या मुद्द्यावर इतक्या ठाम शब्दांत प्रतिक्रिया देण्यात आल्याने, राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.