• Download App
    NCP Merger | The Focus India

    NCP Merger

    CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले- ‘राष्ट्रवादी’चे विलीनीकरण झाले तर बोलणार; हवेत पतंगबाजी का करायची?

    राष्ट्रवादीच्या विलीनकरण संदर्भात त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्याविषयी माझा बोलण्याचा काहीही संबंध नाही. त्यांचा पक्षांतर्गत निर्णय झाल्यानंतर ते महायुतीकडे तसा प्रस्ताव घेऊन येतील. त्यानंतर मात्र, नक्कीच याविषयी बोलणे योग्य ठरेल. मात्र, तोपर्यंत हवेत पतंगबाजी का करायची? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

    Read more

    Sharad Pawar : चर्चेत नव्हते, त्यांना बैठकीबद्दल काय माहिती असणार? फडणवीसांचा दावा फेटाळत शरद पवारांचा सवाल; अधिवेशनासाठी दिल्लीला जाणार

    राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्याआधी 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांच्या निवासस्थानी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात बैठक झाल्याचा दावा शरद पवार गटातील नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. या दाव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे नकार दिला होता.

    Read more

    Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाजपला विचारावे लागेल, छगन भुजबळांचे विधान, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

    दोघे ठाकरे जसे एकत्र आले तसे पवार एकत्र यावे, असे विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. तसेच ते म्हणाले की अशा काही चर्चा झाल्या नाहीत असे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले. माझ्याशी कधीही हे बोलले नाही, कल्पनाही नाही. तसेच दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण करायचे असेल तर भाजपला विचारावे लागेल, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

    Read more

    Sunil Tatkare : सुनील तटकरे म्हणाले- विलीनीकरणावर आधी शरद पवार गट बोलेल, मग आम्ही बोलू, राऊतांच्या टीकेला महत्त्व नाही

    आज आम्ही एनडीमध्ये भाजपसोबत सत्तेत आहोत. देशाच्या विकासासाठी आम्ही एक आहोत. भाजपच्या विचारांशी प्रणित एनडीएमध्ये येण्यासाठी भूमिका ज्यांना सोबत यायचे त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. अजित पवारांच्या नेतृत्वात आमच्या पक्षाची भूमिका ठरली, त्यानुसार आम्ही निवडणूक लढवली आणि जिंकलो, विलीनीकरणाबद्दल शरद पवार गटातील नेते बोलल्यानंतर आम्ही बोलू, असे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे

    Read more