NCP Sharad Pawar : पुण्यात राष्ट्रवादी एकत्र येण्याची स्पष्ट चिन्हे:; गुप्त बैठकीनंतर शरद पवार-अजित पवार गटातील हालचालींना वेग
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात महत्त्वाची हालचाल सुरू झाली असून, फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीसोबत मिळून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहेत. भाजपविरोधात ताकद एकवटण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आज उशिरा महत्त्वाची बैठक होणार असून, या बैठकीत जागावाटप, निवडणूक रणनीती आणि एकत्र लढण्याचा आराखडा ठरवला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काँग्रेसचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील यांच्याशी पुणे महापालिकेत आघाडी म्हणून लढण्याबाबत प्राथमिक चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.