Nawab Malik : बीड प्रकरणावरून नवाब मलिकांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर; राज्यात पक्ष आणि पक्षनेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचे नाही
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय अधिवेशन शिर्डी येथे सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी भाषण करताना बीड प्रकरणावरून पक्षाला घरचा आहेर दिला. राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभरात पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होत आहे