Navnath Ban : भाजपचा ठाकरेंवर हल्लाबोल- शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याने उबाठाचा मोर्चा फसला, लोकसभेला तुमचाच माणूस जिंकला, तिथे मतचोरी नव्हती का?
छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना रिकाम्या खुर्च्यांमुळे हंबरडा फोडण्याची वेळ आली होती. शेतकऱ्यांच्या नावावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न उबाठा गटाने केला आहे.पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देवाभाऊ यांनी मदत केल्याने त्यांनी मोर्चा कडे पाठ फिरवली त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांमुळे हंबरडा फोडण्याची वेळ आली, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. त्यामुळे हंबरडा मोर्चाची भाषा राऊतांनी करू नये.