Rahul Gandhi : यूपी निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे दावे फेटाळले; कर्नाटक आयोगाने म्हटले- राहुल यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे
उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य श्रीवास्तव आणि विशाल सिंग यांची नावे इतर राज्यांसह उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि लखनऊच्या विधानसभांमध्ये नोंदणीकृत असल्याचा राहुल गांधी यांचा दावा रिनवा यांनी फेटाळून लावला.