Praful Patel : प्रफुल्ल पटेलांचा ठाकरेंना सवाल- मुख्यमंत्री असताना तुम्ही किती मदत केली?
राज्यातील पूरस्थितीवरून राजकारण तापले असून, आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मदतीवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल्ल पटेल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, ‘मुख्यमंत्री असताना त्यांनी नैसर्गिक आपत्तीत किती मदत केली?’ असा सवाल केला आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही त्यांच्या शैलीत प्रफुल्ल्ल पटेल यांना प्रत्युत्तर दिले आहे.