Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्रिपदावर गिरीश महाजनांचा दावा; छगन भुजबळ म्हणाले – सात आमदार असताना आम्ही का मागे राहू?
महायुतीमध्ये सुरू असलेला नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यातील एका कार्यक्रमात थेट “नाशिकचा पालकमंत्री मीच होणार,” असे ठामपणे सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. तर गिरीश महाजन यांच्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही नाशिकच्या पालकमंत्री पदावर आपल्या पक्षाचा हक्क असल्याचे म्हटले आहे. दोघांच्या विधानामुळे महायुती सरकारमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.