CM Fadnavis : वृक्षतोड व्हावी असे कुणाचेही मत नाही; पर्यावरण व कुंभमेळा दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या तपोवणातील वृक्षतोडीला विरोध दर्शवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नाशिक तपोवनात वृक्षतोड व्हावी असे आमच्यापैकी कुणाचेही मत नाही. या प्रकरणी अधिकाधिक झाडे वाचवण्याचे प्रयत्न केले जातील. आमच्यासाठी पर्यावरण व कुंभमेळा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असे ते म्हणालेत.