Girish Mahajan : गिरीश महाजन म्हणाले, उद्या संजय राऊत भाजपमध्ये आले तर आश्चर्य नाही; अनेक टीकाकार आज भाजपत असल्याचा दिला दाखला
भाजपवर टीका करणारे अनेक नेते आज भाजपमध्ये दिसत आहेत. त्यामुळे उद्या संजय राऊतही भाजपमध्ये आले तर आश्चर्य वाटणार नाही, असे सूचक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. महाराष्ट्राचे राजकारण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तापले असताना त्यांनी हे विधान केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.