Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त वाढणारी वाहतूक आणि भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक नियोजन अधिक सक्षम करण्यासाठी नाशिक बाह्यवळण रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. या रस्त्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करावा, तसेच भाविकांना दर्जेदार वाहतूक सुविधा देण्यासाठी ई-बस एकात्मिक सेवा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.