Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी; मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी
राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर हा महत्त्वपूर्ण टप्पा समोर आला असून आता माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे.