Sanjay Raut, : संजय राऊत म्हणाले- राज्यात जातीय अराजकता निर्माण होऊ शकते; नाशिकमध्ये गुंडगिरी, ड्रग्ज, शेतकरी आत्महत्या वाढल्या
मराठा समाजाला आरक्षण देताना काय गुप्त गोष्टी झाल्या ते आता हळू हळू बाहेर पडत आहे. त्यामुळे मला भीती वाटत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की सरसकट आरक्षण दिलेले नाही. मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली तर राज्यात अराजकता निर्माण होईल, असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. मला असे वाटते आहे की या राज्यात जातीय अराजकता निर्माण होऊ शकते.