MCOCA : दुधामध्ये घातक भेसळ करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ लागणार; अंधेरीतील भेसळ प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धरले धारेवर
दुधामध्ये पाण्याची आणि घातक पदार्थांची भेसळ करून लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्यांविरुद्ध आता “मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिले. अंधेरीतील दूध भेसळ प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर मंत्र्यांनी संबंधित घोषणा सभागृहात केली.