Narendracharya Maharaj : नरेंद्राचार्य महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान, श्री संप्रदायाची वडेट्टीवारांविरोधात राज्यभरात निदर्शने
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी श्री संप्रदायाचे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नरेंद्राचार्य महाराजांचे शिष्य आणि अनुयायी आक्रमक झाले आहेत. श्री संप्रदायाच्या वतीने आज राज्यभरात विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात आंदोलन पुकारले आहे. विजय वडेट्टीवार यांनी माफी मागावी अशी मागणी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शिष्य आणि अनुयायांनी केली आहे.