Manoj Jarange : मनोज जरांगेंची टीका- धनंजय मुंडे म्हणजे शेखचिल्ली, ज्या फांदीवर बसतात तीच तोडतात, नार्को टेस्टचाही उल्लेख
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी गुरूवारी पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. धनंजय मुंडे हे शेखचिल्ली आहेत. ते ज्या फांदीवर बसतात, तीच फांदी तोडतात. त्यांनी नार्को टेस्टच्या मागणीवरून मागे हटू नये. या चाचणीतून तरी त्यांनी महादेव मुंडे यांचे काय केले, बापू आंधळेंचे काय केले, गित्तेचे काय केले व संतोष देशमुख प्रकरणात काय केले हे समोर येईल. नार्टो टेस्टमधून त्यांनी अंधारात किती चाली रचल्या हे ही सत्य समोर येईल, असे ते म्हणाले.