Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा भाजप कार्यकर्त्यांना सल्ला- इतिहासात पापाचे धनी होऊ नका, तुम्ही कोणते विष पोसत आहात हे डोळे उघडून पाहा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या कृत्याकडे नीट डोळे उघडून पाहण्याचे आवाहन केले. इतिहासात आपल्या नावाची पापाचे धनी म्हणून नोंद होऊ देऊ नका. त्यामुळे आपण काय करत आहात व कोणते विष पोसत आहात याकडे एकदा डोळे उघडून नीट पाहा, असे उद्धव भाजप कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हणालेत.