Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी विरोधी पक्षनेते पदाचा त्याग करेल; सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटते, भास्कर जाधवांची टीका
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी विरोधी पक्ष नेत्यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने टीका केली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटते, विरोधी पक्षनेता दिला तर सरकारमधील सहकारी त्याला माहिती देऊन आपल्याला अडचणीत आणतील अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे सरकार विरोधी पक्षनेत्यावर कोणताही निर्णय घेत नाही, अशी टीका जाधव यांनी केली आहे.