• Download App
    Nagpur SBL | The Focus India

    Nagpur SBL

    Nagpur SBL : नागपूर एसबीएल स्फोट प्रकरण; मृतांचा आकडा 18 वर, मालकासह 21 अधिकाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा

    नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या आता १८ वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान आणखी एका जखमीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिस प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली असून, कंपनीचे मालक संजय चौधरी यांच्यासह २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. काल रात्री राबवलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी आतापर्यंत ९ जणांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू आहे.

    Read more

    Nagpur SBL : नागपूरलगतच्या SBL कंपनीत स्फोट; 17 ठार, 18 जखमी; दारुगोळा तयार करताना घडली घटना, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

    नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड (पूर्वीची स्पेशल ब्लास्ट लिमिटेड) या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज सकाळी भयंकर स्फोट झाला आहे. त्यात 17 कामगार ठार झाले असून, अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

    Read more