Nagpur riots : नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खानसह 6 आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा
नागपुरात भडकलेल्या हिंसेचे उदात्तीकरण करीत हिंसा पुन्हा भडकावी यासाठी दंगलीच्या व्हिडिओवर देशविघातक कॅप्शन लिहून व्हायरल करणारा नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान शमीम खान याच्यासह सहा आरोपीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.