Devendra Fadnavis : ज्याने मागच्या जन्मी पाप केले तो नगरसेवक होतो, तर महापाप करणारा महापौर, नागपुरात सीएम देवेंद्र फडणवीसांचे मिश्किल वक्तव्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर येथे गेले असताना एका मुलाखतीत त्यांना त्यांच्या नगरसेवकाच्या काळातला किस्सा विचारण्यात आला, यावर फडणवीसांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. तसेच महापौर आणि नगरसेवकाचा जॉब एकदम टफ असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ज्याने मागच्या जन्मी पाप केले तो नगरसेवक होतो आणि ज्याने महापाप केले तो महापौर होतो, असेही फडणवीस यांनी गंमतीने विधान केले.