Nagpur city : नागपूर शहरातील संचारबंदी पूर्णत: हटवली; पोलिस आयुक्तांनी जारी केले आदेश
नागपूर शहरात 17 मार्च रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास दोन गटांत मोठा हिंसाचार उसळला होता. या घटनेनंतर पोलिसांनी नागपूर शहरातील 11 पोलिस ठाण्यांच्या संचारबंदी लागू केली होती. हिंसाचाराच्या सहा दिवसांनंतर आज रविवारी दुपारी तीन वाजेपासून शहरातील संपूर्ण संचारबंदी हटवण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.