ठाकरे + पवारांनी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला सोडले वाऱ्यावर; आले सात आणि आठ वर; महाराष्ट्रातल्या गावांनी ठाकरे आणि पवार ब्रँडची लावली वाट!!
महाराष्ट्रातल्या नगरपरिषदा, नगरपंचायती नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजप महायुतीचा डंका वाजला, यात काही विशेष घडले नाही, तसा डंका तो वाजणारच होता. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पायाला भिंगरी लावून कार्यकर्त्यांच्या निवडणुकीतला प्रचार केला होता.