Mysore Pak : आता ‘म्हैसूरपाक’ नाही ‘म्हैसूर श्री’ म्हणायचं
शेक्सपियरने नावात काय आहे हे सांगितले होते पण कदाचित जयपूरमधील काही लोक याच्याशी सहमत नसतील कारण त्यांनी लोकप्रिय गोड ‘मोती पाक’ चे नाव ‘मोती श्री’ आणि ‘म्हैसूर पाक’ चे नाव ‘म्हैसूर श्री’ असे ठेवले आहे. या मिठाई तशाच आहेत, फक्त देशातील पाकिस्तानविरोधी रोष लक्षात घेता त्यांची नावे बदलण्यात आली आहेत.