Myanmar Cyber Scam : एआयद्वारे फसवणूक; स्कॅमर 100 भाषांतून फसवताहेत; म्यानमारमध्ये 50 हजार फसवणुकीचे लक्ष्य, पूर्ण न झाल्यास विजेचा धक्का आणि तरुणींवर बलात्कार
चार दिवसांत समोरच्याला प्रेमात पाडा.’ हा काही फिल्मी डायलॉग नाही, तर म्यानमारमधील सायबर स्कॅम सेंटर्समध्ये काम करणाऱ्यांना दिला जाणारा आदेश आहे. डिजिटल जगात विश्वास आणि भावनांना शस्त्र बनवून चाललेल्या सायबर महाफसवणुकीच्या कारखान्यात नोकरीचे आमिष दाखवून भारत आणि इतर अनेक देशांतून तस्करी करून आणलेले तरुण-तरुणी सामील आहेत.