• Download App
    MVA MNS | The Focus India

    MVA MNS

    Mumbai Satya March : मुंबईत आज सत्याचा मोर्चा; महाविकास आघाडी आणि मनसेची निवडणूक आयोगाविरोधात एकजूट; काँग्रेसमध्ये मनसेसह आंदोलनावरून मतभेद

    मतदार याद्यांमधील गंभीर घोळ, मतचोरी आणि दुबार नावांवरून उसळलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत ऐतिहासिक सत्याचा मोर्चा निघणार आहे. महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात हा मोर्चा काढत आहेत. सत्याचा मोर्चा, या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या आंदोलनातून मतदार नोंदणी प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेविरोधात आवाज उठवला जाणार आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू दीर्घकाळानंतर एकत्र एका मंचावर दिसणार आहेत. दुपारी एक वाजता फॅशन स्ट्रीटवरून सुरू होणारा हा मोर्चा मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महापालिका मुख्यालयासमोर पोहोचणार आहे, जिथे नेत्यांची भाषणे होणार आहेत.

    Read more