MVA Boycotts : सरकारची कर्जमाफी फसवी, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा:महाविकास आघाडीची मागणी; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
राज्य सरकारच्या अपयशी कारभाराविरोधात आणि जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारच्या असंवेदनशील भूमिकेचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने विधानमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत करण्यात आली.