Supriya Sule : सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य- माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेले चालते:तुम्हाला काय प्रॉब्लेम?
मी मटण खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते, तर तुम्हाला काय अडचण? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना केला आहे. आम्ही आमच्या पैशांनी खातो. आपण कुणाला मिंधे नाहीत, असेही त्यांनी म्हटले. तसेच, त्यांनी महायुती सरकारवरही अनेक मुद्द्यांवरून टीका केली. त्या दिंडोरी येथे महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलत होत्या.