Muslim reservation : मुस्लिम आरक्षणावरून गदारोळ; भाजपने म्हटले, घटना बदलू देणार नाही; कर्नाटकात मुस्लिमांना आरक्षणावरून भाजप-काँग्रेस आमनेसामने
कर्नाटकात मुस्लिमांना सार्वजनिक कंत्राटात ४% आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सोमवारी राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. भाजप खासदारांनी हा मुद्दा उचलत काँग्रेसवर घटना बदलण्याचा आरोप केला. संसदीयकार्य मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जे घटनात्मक पदावर आहे, त्यांनी सांगितले की, पक्ष घटना बदलून मुस्लिमांना आरक्षण देईल. हे कुणी सामान्य माणसाने म्हटले असते तर आम्ही गांभीर्याने घेतले नसते.